About Us

श्री. केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था

आपली श्री. केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था आज उत्तम प्रगतीपथावर आहे, पतसंस्थेने मागील वर्षात उत्तम व्यवसाय करून नफ्यात व व्यवसायात उत्तम वाढ केली आहे, पतसंस्थेने ठेव योजना कार्यान्वित करून उत्तम ठेवी प्राप्त केल्या.
मागील कार्य योजना पत्रकामध्ये पतसंस्थेची उद्दीष्टे दिले होते,त्याची पूर्तता जवळपास झालेली असून ३१ मार्च २०१६ साली रुपये ३,४४,२२,७७४/- वरून रुपये ८९,६२,७२४/- ने वाढ होऊन ३१ मार्च २०१७ रोजी रुपये ४,३३,८५,४९९/- इतके झाले आहे.

आपल्या संस्थेच्या ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सहकारी वर्षांचा ताळेबंद, नफा-तोटा
पत्रक आणि संस्थेच्या २९ वा वार्षिक अहवाल संचालक मंडळाच्या वतिने सादर करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. चालू अहवाल सालमध्ये विशेष प्रगती केल्याचे अहवालातील आकडेवारीवरून आपल्या लक्ष्यात येईलच. आपणा सर्वांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीला जो हातभार लागलेला आहे त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे, ह्यापुढे प्रगतीच्या वाढीच्या वेगास आपले मोलाचे सहकार्य लाभेल अशी मी आशा बाळगतो.

मागील कार्ययोजनेनुसार पतसंस्थेने आपल्या ग्राहकांना RTGS, NEFT, Sales Tax, Income Tax, Service Tax, Professional Tax च्या चालान भरण्याची सुविधा पतसंस्थेने देऊन आपल्या इतर उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे. तसेच ग्राहकांना या या वार्षिक कार्ययोजना मध्ये भारतातील कोणत्याही ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देत आहोत.
पतसंस्थेने कोअर बँकिंग प्रणालीमध्ये प्रवेश केला असल्यामुळे पतसंस्थेच्या व्यवसायात निश्चित वाढ झाली आहे. परंतु याची सर्वात मोठी जबाबदारी कर्मचारी व अधिकारी वर्गावर आहे. कारण या वार्षिक कार्ययोजनामध्ये पतसंस्थेच्या व्यवसाय वाढ व ग्राहक सेवा यावर कटाक्षाने भर देणार आहे. हे केले तर पतसंस्थेची उन्नती व प्रगती होईल.